शनिवार, फ़रवरी 18, 2006

व्हॅलेन्टाईन डे

नेहमीप्रमाणे व्हॅलेन्टाईन डे ला तथाकथित संस्कृती रक्षकांनी त्यांच्या ताकदीनुसार विरोध केला. प्रेम ही माणसाच्या मनातील उपजत भावला आहे. व्हॅलेन्टाईन डे हे केवळ निमित्त मात्र. प्रत्येकास त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा निश्चितच अधिकार आहे, जोपर्यंत दुसर्‍यांना त्याचा त्रास होत नाही. गुजरातमध्ये बजरंग दलाने सार्वजनिक ठिकाणी मोठे फलक लावून त्यावर मुलींच्या पालकांना खालीलप्रमाणे सावध केले होते.

व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी तुमची मुलगी कुठे जाते त्यावर लक्ष ठेवा
ती देवळात जाते म्हणून सांगुन बाहेर जाईल.
मैत्रिणीं सोबत जाते म्हणून सांगेल.
पिकनिकला जाईल.

परंतु संध्याकाळी ती घरी पवित्र येईल का?

कुणाही सभ्य माणसाला लाज वाटेल असा हा किळसवाणा प्रकार आहे. पावित्र्य काय फक्त मुलींनीच जपायचे असतं? हा अनाहुत सल्ला मुलांच्या पालकांना का दिला नाही? संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना घरात कोंडून ठेवण्याचाच हा प्रकार आहे. रांचीमध्ये तर बाहेर फिरणार्‍या जोडप्यांचे फोटो काढून ते त्यांच्या पालकांना पाठविण्याची धमकी दिली गेली. तसेच काहीजणांनी जबरदस्तीने लग्न लावण्याचाही इशारा दिला. व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने जर कुणी हिडीस प्रकार करीत असेल तर त्याला निश्चितच रोखले पाहिजे. परंतु दुसर्‍यांना त्रास न देता जर कुणी प्रेमदिन साजरा करीत असेल तर त्याला विरोध का? मला वाटतं, इतर संस्कृती मधील चांगल्या गोष्टी घेण्याने भारतीय संस्कृतीचा र्‍हास होणार नाही.

बुधवार, फ़रवरी 15, 2006

संस्‍कृती रक्षक

नेहमीप्रमाणे व्हॅलेन्टाईन डे ला तथाकथित संस्कृती रक्षकांनी त्यांच्या ताकदीनुसार विरोध केला. प्रेम ही माणसाच्या मनातील उपजत भावला आहे. व्हॅलेन्टाईन डे हे केवळ निमित्त मात्र. प्रत्येकास त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्याचा निश्चितच अधिकार आहे, जोपर्यंत दुसर्‍यांना त्याचा त्रास होत नाही. गुजरातमध्ये बजरंग दलाने सार्वजनिक ठिकाणी मोठे फलक लावून त्यावर मुलींच्या पालकांना खालीलप्रमाणे सावध केले होते.

व्हॅलेन्टाईन डे च्या दिवशी तुमची मुलगी कुठे जाते त्यावर लक्ष ठेवा
ती देवळात जाते म्हणून बाहेर जाईल
मैत्रिणीं सोबत जाते म्हणून सांगेल
पिकनिकला जाईल
परंतु संध्याकाळी ती घरी पवित्र येईल का?

कुणाही सभ्य माणसाला लाज वाटेल असा हा किळसवाणा प्रकार आहे. पावित्र्य काय फक्त मुलींनीच जपायचे असतं? हा अनाहुत सल्ला मुलांच्या पालकांना का दिला नाही? संस्कृतीच्या नावाखाली स्त्रियांना घरात कोंडून ठेवण्याचाच हा प्रकार आहे. रांचीमध्ये तर बाहेर फिरणार्‍या जोडप्यांचे फोटो काढून ते त्यांच्या पालकांना पाठविण्याची धमकी दिली गेली. तसेच काहीजणांनी जबरदस्तीने लग्न लावण्याचाही इशारा दिला.
व्हॅलेन्टाईन डे च्या निमित्ताने जर कुणी हिडीस प्रकार करीत असेल तर त्याला निश्चितच रोखले पाहिजे. परंतु दुसर्‍यांना त्रास न देता जर कुणी प्रेमदिन साजरा करीत असेल तर त्याला विरोध का?
मला वाटतं, इतर संस्कृती मधील चांगल्या गोष्टी घेण्याने भारतीय संस्कृतीचा र्‍हास होणार नाही.